Friday, June 14, 2019

नसलेल्या प्रेमाची गोष्ट

नसलेल्या  प्रेमाची गोष्ट



तो बोलला -
"मला तू आवडतेस , मला तुझ्याशी भेटायला, बोलायला खूप आवडत, तुझ्याशी बोलताना मला वेळेचा भानच राहत नाही, अलार्म लावायला लागतो. मला हे सर्व मान्य आहे पण तरीही मला तू 'आवडतेस', मी तुझ्यावर 'प्रेम' करत नाही." 

"अरे स्वप्नील? काय बोलतो आहेस ते नक्की कळतंय का तुला? "  अमु नि कळवळून विचारलं

"हो कळतंय कि, तूच बोललीस न खरं बोल म्हणून?  गेल्या १५ दिवसात तू एक दोन वेळेसं मला whats app केलास तेव्हाच खरतरं काही क्षण मला तुझी आठवण आली, तू समोर नसलीस तरी तुझ्या सारखं मला कासावीस होत नाही!  तुझ्या इतक्या माझ्या भावना तीव्र नाहीयेत गं, त्यामुळे मला खात्री आहे कि मला तू आवडतेस, पण मी त्याला प्रेम म्हणू शकत नाही. मला तुला अजिबात  दुखवायचं नाहीये गं अमु , पण तुझ्या इतक्या माझ्या भावना तीव्र नाहीत हा माझा दोष कसा?

अमु स्तब्ध झाली होती - आतून नक्की काय होतंय तेच कळत नव्हतं...प्रचंड वेदना होत होत्या पण चेहऱ्यावर त्या नक्की कशा उमटत आहेत ह्याचं तिला भान राहिलं नव्ह्त.

अमु च्या नजरे समोरून झरझर ६ महिने गेले...अगदी आत्ता १५ दिवसा पूर्वीच गावाला जायच्या आधी  तू बोलला होतास कि - "अमु, मला दुर्दैवानी तुझ्याशी बोलता येणार नाही, घरच्यांच्या समोर मला नाही जमणार बोलयला, पण ऐक नं अमु - मला वाटतंय मी तुला नक्की miss करीन".

अमुच्या चेहऱ्या कडे बघून स्वप्नील ला थोडा वाईट वाटलं, पण तो पुढे जास्त काही बोलला नाही.

काही क्षण तसेच अवघडलेले गेले. मग अमु थोडी सावरली -

"ठीक आहे स्वप्नील, झोपलेल्या माणसाला जागं करता येते, झोपेचं सोंग घेतलेल्या माणसाला नाही! आपण इथेच थांबूया"

 "अमु, तू अशी फोर्मल बोलायला लागलीस कि वाईट वाटत गं, आपण संपर्कात राहूया, मला नातं नाही तोडायचं, काही गोष्टी आपण काळावर सोडून देउया कि..."

"माझं जे काही नातं आहे किंवा होतं ते तुझ्याशी..ह्यात काळाचा काय संबंध स्वप्नील आणि किती काळ लागेल तुला तुझ्या झोपेच्या सोंगा तून बाहेर यायला? १ महिना, ३ महिने, ६ महिने, १२ कि १८ महिने?   तो पर्यंत मी काय करायचं? तुझ्या आयुष्यातलं एक नगण्य कस्पट म्हणून आणि तुझी माझ्यावर किती आणि कधी प्रेमाची कृपा दृष्टी होईल ह्या आशे वर मी नुसतीच थांबून राहायचं?"  अमु पोटतिडकेनी बोलली

"ओके. अमु, हे खूप ताणलं जातंय. दोघांनाही त्रास होतोय. ठीक आहे. आपण थांबूया. ह्यात मला हि त्रास होणार आहे पण इलाज नाही"  स्वप्नील बोलून गेला...त्याच्या बोलण्यात कुठे खरच दुखरा कोपरा आहे का हे बघण्याची अमु ची केविलवाणी धडपड होती...तिला तो नीटसा दिसला नाही. स्वप्नील खरच उत्तम actor आहे कि त्याला नगण्य त्रास झाला हाच प्रश्न अमुला पडला. पण ती काहीच बोलली नाही.

"तुझ्या सारख्या माझ्या भावना नसताना, तुला थांबावायचा अधिकार मला नाही"

अमु अचानक जोरात हसली - " तुझ्या शेवटच्या वाक्या मधली थिअरी खोटी आहे, असा जेव्हा तुला वाटेल तेव्हा मला नक्की कळव. नक्की "

अमु चं असं अचानक हसणं स्वप्नीलला खटकल, तिला नक्की वेड लागलं आहे किंवा लवकरच लागेल, असं  त्याला एकक्षण वाटलं. आणि त्या वेडाला आपण करणीभुत आहोत - असं हिला सुचवायचं आहे का? ह्या विचारांनी त्याला तिचा राग आला! 

"मी हिला माझ्या मध्ये इतका गुंतायला सांगितला होत का?  मला नाहीये  तिच्याबद्दल प्रेम! गेले ३-४ महिने, दिवस रात्र हिने मात्र येताजाता, whats app सकट 'आय लव यु', 'सोनुल्या', 'गोडूल्या' असा पोरकट उच्छाद मांडला होता. मला आवडत होत ते थोडफार, नाही असं नाही पण मी कधी माझं प्रेम व्यक्त केलं होतं का? मग  मला आरोपीच्या पिंजऱ्यात का उभी करते आहे हि??? इमोशनल फुल कुठली!!!" 

हे सगळे विचार स्वप्नील च्या चेहऱ्यावर थोडेफार आले असावेत.

ते बघून अमु सावरली. आपली किमंत स्वप्नीलच्या भावनिक जगात 'शून्य' ठरली आहे हे तिला जोरात ठणकलं.

ती अजून उणी व्हयला नको ह्या भीतीने मग अमु ने उगाच निर्विकार मुखवटा घातला. म्हणाली -  "फॉर ऑल प्रक्टिकल पर्पज मी तुझे सगळे पिक्स डिलीट करते आहे" - स्वप्नीलचे सगळे फोटो त्याच्या समोर मोबाईल फोन मधून डिलीट केले. स्वप्नील ला फारसा फरक पडला नाही. 

उरलं सुरलं बळ एकवटून अमु बोलली - "तुला कुठलीही मदत लागली, तर मला नक्की कळव स्वप्नील. मी आहे. कायम. माझ्या दृष्टीनी ह्या नात्याला तेव्हढी किंमत नक्कीच आहे आणि राहिलं. पण त्या पलीकडे आपण थांबूया!" 
"Thanks!" स्वप्नील इतकंच बोलला.

अमु त्याच्या कडे न बघता कार कडे चालती झाली. डोक्यात मात्र गेल्या ६ महिन्याचा कल्लोळ होता, जो तिच्या नकळत डोळ्यातून बाहेर पडत होता.

मागून कदाचित स्वप्नीलची "ए ढापणे" अशी हाक येईल ह्या केविलवाण्या आशेनी एकदोन वेळा ती काहीतरी निम्मित करून मधेच थांबली. पण हाक आलीच नाही. ते अपेक्षाभंगाचे क्षण ती आजन्म विसरू शकणार नव्हती.

आपलं नक्की काय आणि कुठे चुकलं हेच तिला कळत नव्हतं.  शेवटी कार पाशी आल्यावर काही इलाजच उरला नाही. आपलं अजून हसू व्हयला नको म्हणून तिने झरकन कार चं दार उघडलं आणि भरकन निघून गेली. आज प्रथमच तिने निघताना स्वप्नील कडे हसून 'फ्लायिंग कीस' दिला नव्हता...
स्वप्नील, अमु गेल्या वर फक्त एक-दोन क्षण रेंगाळला व तिथून ताडताड निघून गेला. 

माणूस गेला कि त्याच्याशी निगडीत, सगळी लोकं एकत्र येऊन, त्याची अंत्ययात्रा काढतात पण नातं मेलं कि ते बरेचदा बेवारस राहत!

अगदी हीच  बेवारशी  भावना अमुला टोचून  गेली.

अमु घरी आली. आतून दार धाडकन बंद केलं आणि बेडरूम मध्ये गेली.  आता तिला धरबंध उरला नाही. ती ढसाढसा रडली. ती शेवटचं इतकी कधी रडली होती तिलाच आठवलं नाही. तिची आई गेली, तेव्हा पण तिने धीर सोडला नव्हता. सगळी कोंडलेली दुखः कदाचित, आज एकदम ओसंडून वाहत होती...

स्वप्नीलला एखाद दिवस वाईट वाटलं पण, खरचटल्यावर आपण नुसता band-aid लावतो तशी त्याची जखम होती बहुतेक..काम, मित्र आणि घरच्यांच्या विचारात त्याला अमुचा विचार करायला वेळ कुठे होता? जे 'प्रेम' नसतं ते विसरायला सोपं असत.

अमु पण कामा वर जात होतीच. कार मध्ये किंवा बरेचदा एकटी असताना असंख्य वेळा तिला स्वप्नील बरोबरचे छोटे छोटे क्षण छळायचे. त्याला SRK सारखी खळी पडायची मस्त!  चक्क 'ब्लश' व्हायचा अमुनी थोडा वेळ त्याच्या कडे एकटक बघितलं कि!

अमु नी बावळट पणे whats app आणि facebook च्या जमान्यात, तो गावाला जाताना, त्याला निनावी चिठ्ठ्या दिल्या होत्या. १५ दिवसाला १५  चिठ्ठ्या!!!

एकदा तो असाच गावाला गेला असताना फोन झाला होता, चोरून. तेव्हा त्याचा आवाज क्षीण वाटला. अमु पोट तिडकेनी बोलून गेली .."काही मदत लागली तर नक्की सांग रे नक्की!" तो हसला...कारण विचारल्या वर बोलला कि -"इतक्या दुरून तू काय मदत करणार गं माझी?  म्हणून हसलो!"
हा असला बावळटपणा आठवला, कि अमुला अजूनच त्रास व्ह्यायचा.

आपण येता जाता त्याच्यावर प्रेमाचा वर्षाव करायचो. शाब्दिकच.

कदाचित, त्यामुळेच आपलं 'प्रेम' हे होळीतल्या भांगे मध्ये घासायचं जे नाणं असत त्याप्रमाणे गुळगुळीत आणि बेढब झालं का? काहीही अति झालं कि त्याचं हसू होतचं कि?? हा प्रश्न मात्र तिला जाम बोचला.

एकदा ऑफिस मधून निघताना तिच्याच नकळत तिने स्वनिल ला कॉल लावला

अमुचा कॉल  अतिशय रुक्षपणे उचलत स्वप्निल अनोळखी बोलला...

ह्याला चहावर आलेली साय आवडत नाही म्हणुन आपण मुद्दाम ती साय त्याच्या समोर  पटकन खाऊन टाकायचो, मग हा चहा पिणार  .. तोच स्वप्निल आहे का हा ?

अमु जाम कळवळली  होती तेव्हा...

,,,,,,
,,,,..
.....
......

अमु  चिकार  आजारी पडली.

कुठूनतरी  कळल्यावर,  स्वप्निलचा काही  दिवसांनी  फ़ोन  आला, अमु आजार विसरली.

तिने परत दोन तीन कॉल केले  ...शेवटी त्याचा कॉल आला ....अणि ठेवायच्या आधी चक्क खेकसला तिच्यावर...

...,,,
.....,,
....,,
.....,,
... ,,,
....,,

आज ३ वर्ष झाली

आयुष्यात कोणी तरी पुढे जाते अणि कोणी मगे उरतोच.

स्वप्निल च प्रमोशन झाले, तो केव्हाच पुढे निघून गेलाय...
.....

.....

......

अमु अजूनही स्वप्निलला आठवत  तिथेच साचून राहिली आहे...

.........

..........

........

अमु अजूनही स्वप्निलला आठवत  तिथेच साचून राहिली आहे...
......

.....

.....
अमु अजूनही स्वप्निलला आठवत  तिथेच साचून राहिली आहे... 

.....

.....

.....