तुला काय फरक पडतो?
“मी सरळच विचारतेय - मी भारतात राहिले किंवा बाहेर गेले, तुला काय फरक पडतो? आपण फक्त मित्र आहोत. ह्या पलीकडे आपल्यात काही आहे अस जर तुला वाटत असेल तर ते साफ चूक आहे”. शुक्रवारी संध्याकाळी पार्किंग लॉट मध्ये ती तटकन तोडून बोलली.
अमित आतून हलला, मग कळवळून बोलला - “अगदी बरोबर! मला काय फरक पडतो? हा गौण आणि किरकोळ मुद्दा आहे. तुला जसं हवं आहे तसं घडो, हि ईश्वर चरणी प्रार्थना.”
तिचा “तुला काय फरक पडतो?” हा प्रश्न अमितला प्रचंड लागला, आतमध्ये “टेंगुळ” पण आले असेल पण – “जिगर का दर्द उपर से मालूम होता है? कि जिगर का दर्द उपर से नही मालूम होता है”, त्याने मागे वळून बघितल तिला ऐकू नाही न गेल? नाहीतर लगेच बोलेल – dialogs!!!
नव्हत ऐकू गेलं तिला. त्यानं मनातच “हुश्श” केलं. तो क्षीण हसला, तिने दुर्लक्ष केलं आणि चालायला लागली, चालताना मध्ये थोडी अडखळली तर पायातली चप्पल सारखी करून, मागे न बघताच निघून गेली.
अमित गाडीत बसला तेव्हा गाडी स्टार्ट करायच्या आधी थोडा थबकला – “खरतर काय चुकीचं बोलत होती ती? काय संबध होता तसा तिचा माझा? हो, ऑफिस मध्ये आपण भेटतो. कधी चहा, तर कधी एकत्र जेवतो, ह्या पलीकडे तिने माझ्या जीवनात आणि मी तिच्या आयुष्यात कसली भर घातली होती?” सर्वात महत्वाचं म्हणजे ती “एंगेज्ड” होती आणि अमित पण.
तरी पण तिने भारत सोडून काय, तर साधं ऑफिस लोकेशन सोडून पण कुठे जाऊ नये अस का वाटतय आपल्याला? नक्की काय आणि का वाटतय हे न समजल्या मुळे अमित चडफडला. तो तेवढच करू शकत होता.
मात्र गाडी जरा ऑफिस मधून बाहेर पडली तेव्हा “तुला काय फरक पडतो?” त्याला परत बोचलं. आता शनिवार आणि रविवार हा प्रश्न CID च्या “कुछ तो है दया” सारखा त्याचा मेंदू कुरतडत राहणार होता.

गाडी चालवत घरी जाई पर्यंत त्याची अवस्था बधीरच होती – “खरच नक्की काय फरक पडतो आपल्याला? कोणी जवळचा माणूसपण देवाघरी गेला तरी १० - १५ दिवसांनी परत तहान भूक सुरळीत होतेच कि? अगदि अंत्यविधी करून आलो तरी शारीरिक क्रिया थांबतात का? मग हा काय फालतू विचार करतोय आपण ??
शनिवार व्यवस्थित गेला. “तुला काय फरक पडतो?” नंतर बोचलं नव्ह्त. अमितला आनंद झाला – चला म्हणजे सिरिअस काही नाहीये, मनाचे खेळ फक्त !!! जेवताना स्वतःशीच हसला, तर आई बाबा आणि बहिणीनी – “काय झाल ह्याला अचानक?” अशा चमत्कारिक नजरेनी बघितलं. अमितनी त्यांच्या कडे बघून नेहमी प्रमाणे क्षीण हास्य केले.
मग शनिवार रात्री उशिरा एकटाच TV channels surf करताना, TV वर कोणीतरी कोणाला तरी बोललं “आप को क्या फर्क पडता है साहब?” काहीतरी परत हललं आतून.

पुढे अमित किती तरी वेळ नुसताच बसून होता. आपण इतके हळवे आहोत??? राग आला त्याला स्वतःचाच. इतकी वर्ष आपण काम करतोय, इतक्या लोकांबरोबर आपण व्यवहार केला आहे, इतकी पुस्तक वाचतो, मग इथेच काय गोची झाली होती आपली? इतकं का लागलं आपल्याला ते वाक्य?
त्या वाक्यात तसं काही वावग नव्ह्त, जिने ते बोलल तिच्यात आणि तिने जस बोललं ह्यात पण काही दोष नव्हता. मग आपण आपल्या मेंदूला , “मेंदू” वड्या सारखा मधोमध भोक का पडतो आहे???
आत्ता पर्यंत त्यान ह्यावर खोलात जाऊन विचार टाळला होता पण आता ते अटळ दिसत होते आणि म्हणूनच त्याला जास्त अस्वस्थ वाटत होतं. नुसता timepass तर नक्की नव्हता. म्हणजे त्याला असं वाटत होतं कि timepass नव्ह्ता, ती २ ३ वेळा बोलली होतीच काय हा timepass चाललाय तुझा?
तिने असं का बोललं असेल? आपण चुकीची गृहितकं लावत होतो का आत्तापर्यंत?

आपल्याला मैत्री पेक्षा जास्त काही आहे असं नेहमी वाटतंय पण नक्की काय हे कळत का नाहीये?
का आपल्याला ती इतकी आवडते वगैरे? आपलं वय काय? आपण काय विचार करतोय?
आपल्याला कोणी आवडल तर त्या व्यक्तीला पण आपण आवडलच पाहिजे का?
ती आणि आपण वेगवेगळे engaged आहोत हे मान्य आहेच आपल्याला. आपण आपली आणि तिची engagement वाऱ्यावर सोडणार नाहीच आहोत?
मला तिचं निव्वळ शारीरक आकर्षण आहे का? तर तिच्या चेहऱ्या पलीकडे कधी नजरहि गेली नाही साधी. एकदा “लो-कट” ड्रेस घालून आली होती, त्या दिवशी माझी नजर तिच्याशी बोलताना, सतत ती सोडून आजु बाजूला फिरत होती, ते निव्वळ मी “शहाणा मुलगा” आहे म्हणून किंवा मला सुंदर मुलीच्या “लो-कट” च वावड आहे म्हणून नव्हे तर हिच्या बद्दल असा विचार करण हा शुद्रपणा ठरेल, असं मला वाटलं म्हणून - हे कसं सांगू तिला?
ती खूप सुंदर आहे. तिच्या कडे तासंतास बघू शकतो मी, पण माझी मजल तिचा हात हातात धरून काही न बोलता लांब चालतोय, अशा स्वप्नरंजना पलीकडे गेली नाही. जाऊ दिली नाही. मुद्दामच! स्वप्नरंजनात पण आमचं engaged status मध्ये आलं होत - हे हि कसं सांगू तिला?
असंख्य प्रश्न...नुसते प्रश्न...अमितच्या डोक्याचा भुगा व्हायला लागला होता. हे सगळं नवीन होतं त्याला, त्यामुळे नक्की काय करावं ते सुचत नव्ह्त. जावेद अख्तर नि “केहने को बहोत कुछ है, मगर किससे कहे हम” का लिहलं असेल ते अनेकदा मनापासून ऐकूनही त्याला आत्ता खर कळत होत.
जे “आकर्षण” नाही, “अफेअर” नाही, जी “निव्वळ मैत्री” नाही, timepass नक्कीच नाही आणि तरीही “मध्यमवर्गीय” सामाजिक बंधनामुळे ज्याला उघडपणे “प्रेम” हि म्हणायला मन घाबरत असं काहीस, हिरण्यकश्यपूचा भर उंबरठ्या वर कोथळा काढल्यागत अमितची अवस्था झाली होती.
आई बाबा आणि बहिण शांत झोपले होते. अमित मात्र खूप दमुनही, भूता सारखा अजून जागा होता.

आपण इतर मित्रांसारखी “दर्द भुलाने के लिये” दारू -सिगारेट पण ओढत नाही ह्याची त्याला प्रथमच उणीव भासली!
मग कधीतरी बसल्या बसल्याच त्याचा डोळा लागला.
अस्वस्थ झोपेत, फणफणून ताप आल्यावर जशी स्वप्न पडतात तस विचित्र स्वप्न त्याला पडलं.
अमित च टेंगुळ आता खूप मोठ झालं होतं, कलिंगडा एवढ! त्याला डोळे, नाक, कान,तोंड आले होते, पण केस नव्हते. ते टेंगुळ त्याची छाती फोडून बाहेर येण्यचा आटोकाट प्रयत्न करत होतं. अमितला छातीत जीवघेण्या कळा येत होत्या. तो कळवळून ओरडत होता, एकटाच.

ती लांबूनच खुर्चीत बसून त्याच्या अवस्थेकडे तिर्हाईताच्या नजरेनी बघण्याचा आटोकाट प्रयत्न करत होती.
एकदा खूप कळवळून “अग आई गं” बोलला, तेव्हा तिच्या डोळ्यात पाणी आलं असं त्याला उगाच वाटलं. त्याला ते पेन किलर वाटलं, नेमक्या त्याच बेसावध क्षणी – त्या टेंगळानी अमितची छाती फोडली आणि हवेतून सूर मारत समोरच्या wall clock शेजारी जाऊन बसलं.
आता ते भिंती वरून मिचमिच्या डोळ्यांनी अमितला आणि तिला बघत होतं. निर्विकारपणे. जणू सुप्रीम कोर्टातला जजच!
अमितला ग्लानी आली होती, छाती रक्तबंबाळ झाली होती, डोळे आणि श्वास मंद पणे उघड मिट होतं होते, तरी तिच्या चेहऱ्यावरची नजर हटत नव्हती.
मग अचानक कोणीतरी दवंडी पिटल्यागत जोरात आवाज दिला – “अमित” vs “ती” असा खटला सुरु होत आहे हो S S S.
टेंगुळ आता अमित कडे बघू लागलं. अमित आता तरी काही बोलणार का? ह्या आशेनी. अमितची नजर मात्र तिच्या चेहऱ्यावरच होती. ती परत निर्विकार झाली होती.
टेंगुळ मोठ्यांनी खाकारल , अमित नि मंदपणे टेंगुळा कडे पाहिलं. आता टेंगुळ त्याच्या कडे जरा रागानी बघत होतं!

जरा कण्हतच तो कसाबसा उठला, उभं राहताना तोल गेला, पडला. त्यानी परत तिच्या कडे बघितलं, तिने पूर्णपणे दुर्लक्ष केलं होतं. “तुझी जखम, तुझा त्रास, मी काय करू? उगाच माझा वेळ वाया जाणार आहे ह्या खटल्यात!” असा भाव होता तिच्या सुंदर चेहऱ्यावर. अमित मनातच बोलला – “बरोबरच आहे तुझं, माझ्या जखमेला मीच जबाबदार आहे”. मग त्याला उभं रहावच लागलं.
टेंगुळ अमितकडे बघत चक्क इंग्लिश मध्ये बोललं, जरबेनी – “विल यु प्लीज स्पीक अप नौ?”
अमित बोलला – “माय लॉर्ड मला कोणावरही कुठलाच आक्षेप किंवा आरोप नाही, फक्त काही प्रश्न आहेत, ज्याची उत्तरं मिळाली तर माझी जखम भरून निघेल लगेच. तेवढी उत्तरं, खरी उत्तरं तुम्ही दुसऱ्या पक्षाकडून घ्यावी इतकीच मनापासून विनंती!”
टेंगुळ होकारार्थ हलल. ती खुर्चीतच थोडी हलली. “काय बोलणार आहे हा वेडा आता?” असा भाव तिच्या सुंदर चेहऱ्यावर होता.
मग अमित क्षीण पणे बोलला - माझे प्रश्न असे आहेत सर -
- आपल्या प्रत्येक भेटीत मला असं का वाटतं कि आपल्यात काहीतरी स्पेशल आहे?
- सगळ्या मित्रां बरोबर तू अशीच वागतेस-बोलतेस का?
- माझ्याशी बोलताना, बरेचदा तू “ब्लश” होतेस असा भास का होतो मला?
अमित आता कधी नव्हे इतका वैतागून बोलायला लागला होता.
- पूर्वी whats app वर तासान तास गप्पा का मारायचीस? त्यामुळे गिल्टी फिलिंग का आलं होतं तुला?
- मला whats app वर “ब्लॉक” करायची वेळ का आली?
- त्याच मला स्पष्टीकरण द्यावं असं का वाटलं ? निव्वळ तुझ्या मनाचा चांगुलपणा किंवा फेअरनेस म्हणून?
- मला whats app वर “ब्लॉक” केल्यानंतरहि मला इतक्या वेळी का भेटत राहिलीस? परम भूतदया म्हणून? किं फक्त चांगला आणि हार्म्लेस मित्र म्हणून?
अमित आता त्र्याग्यानी बोलत होता.
- त्यानंतरही एका दिवसात आपण ३ ३ वेळा भेटलो, तरी कंटाळा येत नाही, हे असं का?
- मुळात ३ ३ वेळा भेटायची मला इच्छा झाली, म्हणून तुला हि ते का चालावं?
- त्या दिवशीच्या ३रया वेळी “आपण खूप भेटतोय हल्ली” असं का बोलली होतीस?
अमित सगळं अवसान एकवटून बोलला
- तू सतत स्वतःवरती निर्बंध लादत असलीस तरी बाहेर “डीनायल” मोड मध्ये आहेस असं का वाटत मला?
- हल्लीच “जे खर आहे ते बोलले” हे बोलताना eye contact का टाळलास?
बस्स! फारसं जोरात बोलायची सवय नसलेला तो, इतक्याश्या जोरकस बोलण्यानी पण थकला, त्याला मोठी उबळ आली आणि खोकतच जमिनीवर बसला. छातीतलं रक्त खाली सांडल.हळूहळू त्याचा श्वास पूर्ववत झाला

त्याचं सगळ उसन अवसान ओसरलं होतं. नजर जमिनीवर होती. “उगाच बोललो आपण इतके, तिला उत्तरं देताना त्रास होईल आता” असं वाटून अपराधी वाटत होतं.
टेंगुळ आता तिच्या कडे उत्तरा साठी बघू लागलं.
शेवटी ती अमितकडे न बघतच उठली – टेंगुळाकडे बघत छानसं हसली.

टेंगुळ पण आपण “जज” आहोत, हे २ क्षण विसरले. शेवटी अमितचच टेंगुळ ते!
अमित अजूनही खाली मान घालून बसला होता.
ती ठामपणे आणि एका श्वासात, एवढच बोलली – “माय लॉर्ड, हा वेडा काय बोलतोय, हे त्याचं त्याला माहित! हे सगळे त्याच्या मनाचे खेळ आहेत! ह्याचा माझा काय संबंध हो??? ह्याच्या मूर्ख प्रश्नाची उघडपणे उत्तरं द्यायला मी अजिबात बांधील नाही!!! मुळात मी इथे आले हेच खूप झालं! माझा वेळ फार महत्वाचा आहे, अशा फालतू गोष्टी वर मी वेळ खर्च करू इच्छित नाही, तरी आपण मला ह्या सगळ्या मानसिक त्रासातुन लगेच आणि पूर्ण मोकळं करावी हि विनंती!!!”

धाप लागली हो तिला.
टेंगुळ हळहळले, अमित कडे रागानी बघत त्यांनी अमितलाच तिला लगेच पाणी देण्याची आज्ञा केली.

अमित तसाच धडपडत उठला, स्वच्छ पाणी ओतले ग्लास मध्ये आणि जितक्या लवकर शक्य आहे तितक्या लवकर तिच्या कडे अडखळत पोचला. त्याचा अवतार जवळून बघितल्यावर, तिच्या चेहऱ्यावर अनामिक भीती उमटली. तिने पटकन पाणी घेतले व भरकन पिऊन टाकले.
ती आपल्याकडे आत्ता बघेल नंतर बघेल ह्या आशेनी, अमित अजूनही तिच्या चेहऱ्याकडे बघत होता. तिने नजरभेट टाळली, चेहरा परत निर्विकार् करत अमितला मागे सरकायचा कोरडा इशारा केला. अमित नेहमीच्याच आज्ञाधारकपणे मागे सरकला.
एवढ्यात टेंगुळ जोरात बोललं – “हे सगळे पुरावे लक्षात घेता, अमितचे प्रश्न हे बिनबुडाचे, गौण आणि शुल्लक ठरतात! त्याच्या बिनडोक प्रश्नामुळे तिला किती मानसिक त्रास झाला आहे ह्याची मी सख्त नोंद घेत आहे! ह्या सगळ्यात “तिचा” कसलाही दोष नसल्याने तिला मी पूर्णपणे निर्दोष जाहीर करत, ताबडतोब सर्व जाचातून मुक्त करत आहे व अमितला आजन्म माझा सांभाळ करावा अशी सक्त मजुरी ठोठावत आहे!!!

सगळे पुरावे???
पण अमितला हा निकाल ऐकून खूप आनंद झाला. “तिला उगाच त्रास झाला आपल्या मुळे, तिला त्रासातून मुक्ती!” त्याच्या चेहऱ्यावर फिकट आनंद उमटला असेल.
ती मात्र त्याच्या कडे “बावळट कुठला!!!” अशा भावानी बघत, झपकन उठली आणि ताडताड निघून पण गेली!
टेंगुळ आता अमितकडे “जाने कहा गये वो दिन” गाण्यात, राज कपूर आपल्या स्वतःच्या छोट्या प्रतिकृती कडे, एकदाच हिरवा चष्मा काढून बघतो, नेमक्या त्याच नजरेनी बघत होतं. ते अलगद भिंतीवरून तरंगत अमितच्या कडेवर येऊन बसलं.

अमितनि टेंगुळाकडे आणि टेंगुळानी अमितकडे क्षीण हसून बघितलं व एकत्र चालत निघाले.
..........आणि रविवार असूनही सकाळी ५ वाजता अमितला जाग आली. त्याला दरदरून घाम आला होता, घशाला कोरड पडली होती.
संपूर्ण रविवार टेंगुळ आतून ठसठसतच होतं, छाती दुखत होती पण आता हि वेदना अश्वथाम्याप्रमाणे आजन्म बोचत राहणार हे मान्य करण्या शिवाय अमितकडे पर्याय नव्हता.
पुढचे सोमवार ते शुक्रवार असेच गेले. अमित आणि ती भेटलेच नाहीत. मग शनिवारी संध्याकाळी tv बघताना अमितच्या मित्राचा फोन आला – बाकीच बोलून झाल्यावर, तो सहज बोलून गेला... अरे “ती” उद्या रात्री बिजनेस विसा वर ट्रावल करते आहे, आम्ही जातोय सोडायला, तू येतो आहेस नं? अमितच्या तोंडातून “नाही” असं निसटलं आणि त्यानी फोन ठेवला.
अमित आता कायमचा गोठला. टेंगळाला एकदाच जोरात कळ आली आणि अमित तिथेच पडला. आवाज ऐकून आई, बाबा, बहिण धावतच बाहेर आले.
अमितच्या निर्जीव देहाचे डोळे मात्र फार सजिव दिसत होते. आई आणि बहिणींनी हंबरडा फोडला, बाबा धपकन खाली बसले...
कोणी तरी tv वर गातच राहिलं – “....मरने के बाद भी मेरी आंखे खुली रही, आदत पडी थी इन्हे इंतजार कि....”

Fantastic Amol.. Many times we can't express our true feelings or I will say we can't understand our own feelings... Tyachya manachi tadfad janavli Mala.. Good try.. Keep it up.. I am one of the great fans of yours
ReplyDeleteHi Amol,
ReplyDeleteWhat a story! Many of us has experienced this. very Good detailing of expressions. I was just thinking what next, will it just remain a blog or we can create a book or one can create a short film of such lovely stories. May be a TV serial. It could be a trend setter, now that every serial is boringly extended .Colors Marathi is still an affordable channel. May be you can write stories keeping TV serials in mind. Also personally I felt that references like CID Daya & Mera nam Joker can be avoided to make the story appealing to even new generation who may not have watched these films.